युवा भिम सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमानी साजरा …

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी

सोलापूर

युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने 72 व्या प्रजासत्ताक दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धआश्रम येथे राष्ट्रीय अध्यक्ष महेश डोलारे यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील वृद्धाना खुर्च्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष युवराज सकट, सोलापूर जिल्हा संघटक नागा अडसूळ, तृतीयपंथीय जिल्हाध्यक्ष आसमा माने, कुर्डवाडी शहराध्यक्ष सुरज अस्वरे, टेंभुर्णी शहराध्यक्ष धनंजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवा भिम सेनेचा वतीने अनाथ, गोरगरीब, बेघर लोकांसाठी विविध उपक्रम,कार्यक्रम, राबविले जातात.प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणताही वायफट खर्च न करता अनोख्या पद्धतीने साजरा केला. वृद्धाश्रमातील लोकांना बसायला उठायला या वयात त्रास होतो हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत वृद्धांना बसायला खुर्च्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन तृतीयपंथी जिल्हाध्यक्ष आसमा माने यांनी केले होते.
यावेळी विकास डोलारे, बंटी अस्वरे, रोहन कांबळे, अनिल आरडे, रत्नदीप लोंढे, बबलू काळे, नरेश इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *