युवा भिम सेनेच्या वतीने जगविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं…

बातमी पुढची बातमी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 18
आण्णाभाऊंनी अन्यायाविरुद्ध झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं स्मरण देऊन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनासाठी उभ्या महाराष्ट्राला प्रेरणा दिली. शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकरांसमवेत “माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतेया कायली” ही लावणी अजरामर केली.
अशा या महामानव लोकशाहीर
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा भिम सेना सामाजिक संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
साहित्यरत्न लोकशाहीर सत्यशोधक आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लोकगीते,पोवाडे आणि साहित्यातून लोकजागृती केली.
“जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव” असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मानव मुक्तीचा मार्ग हाच दलित उपेक्षित अन वंचित घटकांसाठी दिशादर्शक आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलित आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे असे अण्णाभाऊंनी सांगून श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली. अशा या थोर साहित्यिकाची आज पुण्यतिथी आहे आजच्या दिवशी १८ जुलै १९६९ रोजी अक्षरांचा शब्द मुका झाला…
साहित्याच्या जंगलातला वाघ झोपी गेला…
या शब्दात आपले मनोगत युवा भिम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश डोलारे यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा भिम सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे,विक्रम कसबे,सुनील काळे, विशाल बनसोडे, सुमित उडानशिवे,निखिल गायकवाड व आदी कार्यकर्ते उपस्थित राहून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *