वैरागकर म्हणताहेत, अभी नही तो कभी नही ! वैरागला पाहिजे नगरपंचायतच ! ग्रामपंचायतीची नको निवडणूक…

ग्राउंड रिपोर्ट

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
वैराग
विकासापासून कोसो दूर राहिलेल्या आणि धड शहरही नाही अन् खेडंही नाही अशी गत राहिलेल्या वैराच्या सर्वांगीण विकासासाठी येथे नगरपंचायत होणं हेच सर्वाधिक महत्वाचं असून आता नगरपंचायत झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं नाही, नगरपंचायतीसाठी ही लढाई आरपारची लढाईची आहे,’अभी नही तो कभी नही’ हेच लढ्याचं सूत्र असा सूर वैराग येथील उत्तरेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत काल निघाला.
नगरपंचायतीची स्थापना आणि होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाच्या विषयावर उत्तरेश्वर मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना, भाजप काँग्रेस, राष्ट्रवादी प्रमुख पक्षांसह अन्य पक्षांचे पदाधिकारी,व्यापारी समाजसेवक, सूज्ञ नागरिक पत्रकार आदी उपस्थित होते.
या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले. वैरागमध्ये नगरपंचायत, वैराग तालुक्याची निर्मिती आणि आणि उजनीच्या पाण्याचा लाभ हे विषय या बैठकीत लक्ष्यवेधी होते. वैरागच्या एकूणच विकासाच्यासंबंधीच्या अजेंड्यावर सर्वच वैरागकरांनी एकत्रीत यायचं आणि दबावगट निर्माण करायचा असेही या बैठकीत ठरले.
या सर्वपक्षीय बैठकीला निरंजन भुमकर, मकरंद निंबाळकर, संतोष निंबाळकर तेजस्वीनी मरोड यांच्यासह शहरातील विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी तसचे व्यापारी सुज्ञ नागरिक ,प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *