सोलापूर तालुका पोलीस ठाणे पोलिसांनी चोरीस गेलेला १ लाख ७८ हजार ८७५ रुपये किमतीची मौल्यवान दागीने व रोख रक्कम आरोपीकडून हस्तगत करून फिर्यादी यांना सुपूर्द…

क्राईम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर

सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतुन दि ०६ जून २०२१ रोजी तक्रारदार महिला रुक्मीनी उर्फ अंबीका भारत धोत्रे(रा.एम.आय.डी.सी,चिंचोली ता.मोहोळ) हया रिक्षा मधुन केगाव ते पाकणी फाटा , पाकणी असा प्रवास करत होते . प्रवासादरम्यान त्यांचे लक्ष विचलीत करून पर्स मधुन १ लाख ६० हजार रूपयाचे दागीने तसेच ४२ हजार ५०० रुपये रोख रक्कम अनोळखी चोरट्या महिलेने चोरून नेले होते . त्यावरून सोलापूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. ४११/२०२१ भा.द.वि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी व त्यांच्या पथकाने गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून महिला आरोपीस अटक करून तिच्याकडुन गुन्हयात चोरलेला १ लाख ७८ हजार ८७५ रूपये किमतीचा मुददेमाल पैकी त्यामध्ये मौल्यवान दागीने रोख रक्कम हस्तगत करण्यात आले होते.
सदर गुन्हयाचा तपास सपोफौ राठोड यांनी केला असुन महिला आरोपी विरुध्द पुरवा हस्तगत करून ०६ दिवसाच्या आत कोर्टात दोषारोप पत्र दाखल केले आहे. फिर्यादी सौ धोत्रे यांनी दागीने ओळखले आहेत.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट सोलापूर यांच्या आदेशाप्रमाणे सदरचे दागीने व रोख रक्कम तकारदार सौ धोत्रे यांना दि . ०१ जुलै २०२१ रोजी सुपूर्द करण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरूण फुगे, सपोफौ बाळु राठोड , सपोफौ विवके सांजेकर , मपोहेकॉ वैशाली कुंभार नेमणुक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *