सोलापूर सोशल फाउंडेशन आणि वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीची पालखी काढण्यात आली…

बातमी पुढची बातमी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 20
सोलापूर सोशल फाउंडेशन व वैष्णवी चॅरीटेबल ट्रस्ट, सैफुल, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 20 जुलै आषाढी एकादशी निमित्त वैष्णवी मंदिर येथे विठू माऊली ची पालखी काढण्यात आली. या दिंडीत सोलापूर सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष बापू देशमुख, संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे यांनी सहभाग घेतला. तसेच वैष्णवी चारिटेबल ट्रस्टचे सेवेकरी नीलिमा शितोळे सोलापूर सोशल फाउंडेशन चे पल्लवी माने यांनी सर्वांचे सहकार्याने दिंडीचे चे आयोजन केले होते.
या दिंडीचे समारोपा नंतर वैष्णवी देवीची पूजा व
वैष्णवी देवी मंदिर परिसराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.दिंडीचे नियोजन करताना सर्व वैष्णवी भजनी मंडळाचे व देवीचे सर्व सेवेकरी यांची मदत मिळाली.
याप्रसंगी संदीप हेसे, श्रीनाथ नळे, सुरेश बिराजदार,अवधूत शिवगुंडे,प्रकाश बूळगुंडे, चिनगुंडे ,नरुंद पंपट, गुरूनाथ कोळी सर राजशेखर स्वामी , विजय स्वामी,अनुप्रीत शितोळे, प्रकाश पाटील (शेगांव)’ डॉ गिरिष कुमठेकर उद्योजक मुकुंद जाधव शिवगोंडा पाटील (औराद)लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक, महिला दिंडीला उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती , सुजाता शास्त्री (संजवाड गावचे सरपंच), योग शिक्षिका अनुराधा खारे ,शहर सचिव संपदा जोशी यांची या कार्यक्रमास बाल गोपाला चे मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *