सोलापुर शहर जिल्हा महिला काँग्रेस प्रभागातील पदाधिका-यांची बैठक संपन्न…

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी

सोलापूर

सोलापुर शहर जिल्हा महिला काँग्रेसची प्रभाग २२ मधिल पदाधिका-यांची बैठक महिला अध्यक्षा कु.हेमा चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकित अध्यक्षा हेमाताई यांनी आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक प्रभागातून बैठका लावून महिला संघटना वाढवून बळकट करण्यासाठी महिला काॅग्रेस आपल्या दारी या उपक्रमास सुरुवात केली असल्याचे सांगितले.
यावेळी प्रभाग २२ मधिल महिलांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच प्रभागातून नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी सुमन जाधव,शिल्पा चांदणे,बसंती साळुंके, मुनेराबी शेख,सुजाता बंडखोर,मसरुन कुरेशी, शांताबाई चलवादी,सविता जगलेकर,स्मिता कात्रे,संगिता लवटे,शितल चंदनशिवे, सोनी कोळी, यांच्यासह महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *