सोलापूर गुन्हे शाखेचा आदर्श उपक्रम भाजी मंडईत बंदोबस्ता बरोबर व्यापाऱ्यांच्या केल्या अँटीजन टेस्ट…

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी

सोलापूर दि 6
कोरोनो विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून शहरांत कडक उपाययोजना सुरु आहेत. सोलापूर गुन्हे शाखेच्या वतीने शहरातील बंदोबस्ता बरोबरच कोरोनो विषाणू च्या संसर्ग रोखण्याकरिता अँटीजन टेस्ट चे आयोजन करून सामाजिक बांधिलीकी जपली आहे.
होम मैदान या ठिकाणी निर्माण केलेले भाजी मंडई येथे सोलापूर शहर गुन्हे शाखा यांच्यावतीने अंटीजन टेस्ट घेण्यात आली.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर सो, सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे सो यांच्या मार्गदर्शनाखाली मंडईतील व्यापाऱ्यांचे रॅपिड अंटीजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी सपोनि संजय क्षीरसागर व पोसई संदीप शिंदे आणि गुन्हे शाखा कर्मचारी यांनी या टेस्टचे नियोजन केले होते. डॉ.जैद शेख , डॉ.रहिमान नगरे यांनी याशिबिरास योग्य ती मदत करून टेस्टचे रिपोर्ट तात्काळ संबंधित व्यापाऱ्यांना दिले आहेत.यावेळी एकूण 64 व्यापाऱ्यांची टेस्ट करण्यात आल्या . सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *