सोलापुरातील पाच प्रभागांमध्ये युवा सेनेच्या शाखांचा शुभारंभ, सोलापूर महानगर पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेना सज्ज रहा- विठ्ठल वानकर

बातमी पुढची बातमी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर- ( प्रतिनिधी )
आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोलापूर महानगपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी युवा सेना सज्ज आहे , असे आवाहन युवा सेनेचे शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर यांनी केले.
  राज्यभरात सर्वत्र आता आगामी काळात निवडणुकांचे वारे वाहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क संपर्क अभियान सुरु आहे. तर युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने सोलापूर दौऱ्यावर असलेले युवा सेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात युवा संवादच्या माध्यमातून युवा सेनेचे संघटन आणखी बळकट करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर सोलापुर शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील देशमुख पाटील वस्ती,प्रभाग क्रमांक १९ मधील निलम नगर,प्रभाग २६ मधील जुळे सोलापूर , प्रभाग १३ मधील न्यू पाच्छा पेठ आणि हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय समोर अशा एकूण ५ ठिकाणी युवा सेनेच्या शाखांचा दणक्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा सैनिकांना मार्गदर्शन करताना शहर युवा अधिकारी विठ्ठल वानकर बोलत होते.
पुढे बोलताना वानकर म्हणाले, सध्या शिक्षण , रोजगार आणि आरोग्य याच्या अनेक प्रकारच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर विध्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या समस्यांना वाचा फोडून विध्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी युवा सेना कटिबद्ध राहणार आहे.
यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले,अमर बोडा,रोहित हंचाटे, जिल्हा सचिव योगेश भोसले,कॉलेज कक्ष अधिकारी शुभम घोलप,समन्वयक गुरुनाथ शिंदे,शिवसेना उप शहर प्रमुख लहू गायकवाड,अर्जुन गायकवाड,विनोद घोडके,सागर शिंदे,राहुल आवताडे,आकाश अंकुश,अमोल गुंड,शुभम कुऱ्हाडकर,प्रथमेश कुलकर्णी,सागर घोडके,राहुल डोंबाळे,अमित घोडके,सिद्धू बिराजदार,मनोहर दोंतुल,अमर अंबट,सागर जाधव,गणेश खरात,अतिश गायकवाड,हरी दांडगे,गोपी मंजुळकर, अनिल विटकर,वयंकटेश पगड्याकुल, राजेश दिड्डी,अनिल ताकमोगे,संकेत काकंडकी यांच्यासह युवा सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *