सोलापूर आकाशवाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ॲपद्वारे सोलापूर आकाशवाणी ऐकण्याला जगभरातील रसिकांची भरभरून पसंदी ! सोलापूर आकाशवाणीचा अटकेपार झेंडा…रसिकश्रोत्यांच्या मनामनातील सोलापूर आकाशवाणीचा देशात डंका, हिंदुस्थानात तिसरे स्थान… आकाशवाणी सोलापूर केंद्राची आकाशाला गवसणी… उत्तुंग यशाबद्दल सुनिल शिनखेडे अन् अर्चिता ढेरे यांच्यासह केंद्राच्या सर्व शिलेदारांवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव..

मोस्ट लोकल न्यूज

शिवगर्जना न्यूज मराठी
सोलापूर,दि.२२ : रसिकश्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेल्या सोलापूर आकाशवाणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ॲपद्वारे सोलापूर आकाशवाणी ऐकण्याला जगभरातील रसिकांनी भरभरून पसंदी दिली आहे. त्यातून सोलापूर आकाशवाणीचा अटकेपार झेंडा लागला आहे.सोलापूर आकाशवाणीचा डंका सातासमुद्रापार वाजला आहे. उत्तुंग भरारी घेत आकाशाला गवसणी घालणाऱ्या सोलापूर आकाशवाणीने हिंदुस्थानात तिसरे स्थान पटकावले आहे. सोलापूर जिल्ह्यावासियांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब आहे.
सोलापूर आकाशवाणीच्या या उत्तुंग यशाबद्दल केंद्राचे धडाकेबाज कॅप्टन सुनील शिनखेडे सर आणि अर्चीता ढेरे मॅडम यांच्यासह संपूर्ण टीमवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सध्याच्या डिजिटल युगातही आकाशवाणी माध्यम अव्वल स्थानी असून, प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एआयआर’ या ॲपला रसिक श्रोत्यांनी भरभरून पसंती दिली आहे. देशभरात या ॲपचा सर्वाधिक वापर करणा-या शहरांमध्ये पुणे प्रथम क्रमांकावर, बेंगलुरू दुस-या क्रमांकावर, तर आकाशवाणी सोलापूर केंद्र तिस-या क्रमांकावर आहे, असे प्रसारभारतीने मे महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या या देशपातळीवरील गौरवपूर्ण स्थानाबद्दल आनंद आणि अभिमानाची भावना केंद्र प्रमुख सुनील शिनखेडे तसेच अभियांत्रिकी विभागप्रमुख अर्चिता ढेरे यांनी व्यक्त केली आहे. आकाशवाणी सोलापूर परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांना श्रोत्यांनी दिलेली ही सर्वोत्तम दाद आहे, असे शिनखेडे म्हणाले. कार्यक्रमांतील नावीन्यपूर्णता, वैविध्य आणि दर्जा या निकषांवर पात्र ठरलेले
आकाशवाणी सोलापूर केंद्राचे प्रसारण देशात सर्वोच्च यादीत तिस-या स्थानी पोचवण्यात रसिक श्रोते आणि चाहत्यांचा वाटा मोठा आहे.
सध्याच्या डिजिटल युगात प्रसारभारतीच्या ॲपचा वापर वाढविण्यासाठीदेखील सोलापूर केंद्राने भरघोस प्रयत्न केले.
सोलापूर केंद्राचे कार्यक्रम ॲपद्वारे जिल्ह्यात राज्यातच नव्हे तर देश-परदेशातही मोठ्या प्रमाणात ऐकले जातात. प्रत्यक्ष कार्यक्रमांदरम्यान आणि नंतरही याबाबतचा फीडबॅक केंद्राला प्राप्त होत असतो. जगभरातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये हे ॲप ऐकले जाते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *