‘शिवगर्जना न्यूज मराठी’ च्या लढ्याला अखेर यश, फक्त आणि फक्त शिवगर्जना न्यूज मराठीनेच ठेवला होता शेवटपर्यंत पाठपुरावा…. स्मशानभूमीतील बोक्यांच्या हजारोंच्या कमाईला लगाम, कोरोना मृतांवर विद्युत आणि गॅस दाहनीत अंत्यंसंस्कार करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश ! लाकडांवर अत्यंसंस्कार करण्याच्या आडून मृतांच्या टाळूवरचे लोणी चाटणाऱ्यांना ‘दे धक्का’

शिवगर्जना नेटवर्क स्पेशल

शिवाजी भोसले / रवि ढोबळे

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. २७
कोरोना विषाणूमुळे मृत्यू आलेल्यांवर विद्युत आणि गॅस दाहिनीवर अत्यंसंस्कार करण्यात यावेत, लाकडावर अंत्यंसंस्कार करण्यात येऊ नयेत, असा आदेश सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी काढून सोलापूरातील महापालिकेच्या सर्वच स्मशानभूमींमध्ये तशी अमंलबजावणी सुरू केली आहे.
दरम्यान आयुक्तांच्या या निर्णयामुळे लाकडावर अंत्यंसंस्कार करण्याच्या खर्चाआडून हजारो रूपयांची ‘माया’ उकळणाऱ्या स्मशानभूमीतील बोक्यांच्या कमाईला लगाम लागू लागला आहे. त्यांचा हा निर्णय ‘दे धक्का’ असा झाला आहे.
विशेषत्वे, आयुक्तांच्या या निर्णयामुळे दुःखद प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांना वेठीस धरून पैसे उकळण्याच्या बोक्यांच्या गोरख धंद्याला चाप बसतानाच, अंत्यंसंस्कारांच्या प्रकरणातून कोरोना महामारीत स्मशानभूमीत दररोज चालणारा पैशांचा बाजार बंद होऊ लागला आहे.
कोरोना मृतांवर अंत्यंसंस्कार करण्याच्या खर्चाआडून पैसे उकळण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू होता. एका अंत्यंसंस्कारासाठी साधारण दहा ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत पैसे उकळले जात होते. दुःखद प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होता.
टायगर ग्रुपची प्रमुख आणि पोलीस दलाल कविता चव्हाण तसेच केतन बाबा यांच्या केअर ऑफ पीस या संस्थेसह अन्य काही जणांच्या टोळ्यांकडून अंत्यंसंस्काराठी हजारो रूपये उकळले जात आहेत, असा आरोप होत होता.तशा तक्रारीदेखील येत होत्या.
उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणात सोलापूरबद्दल महाराष्ट्रात नकारात्मक चर्चा झाली. चांगल्याचे कौतुक करताना, वाईट अन् असत्य पायदळी घेणाऱ्या तसेच नेहमी जागल्याची भूमिका ठेवणाऱ्या ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ ने या प्रकरणात सर्वप्रथम उडी घेऊन या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावला.
मृतांच्या अंत्यंसंस्कार प्रकरणात वेगवेगळ्या शक्कल लढवून पैसे लाटण्याच्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी केवळ ना केवळ शिवगर्जना न्यूज मराठीने महापालिका आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, मंञालयीन सचिव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा ठेवला होता.
खास बाब म्हणजे वरकमाईसाठी चटावलेले स्मशानभूमीतील बोके आणि त्यांचे हितचिंतक यांच्याकडून शिवगर्जना न्यूज मराठीचा या प्रकरणातील आवाज दाबण्याचा कित्येकदा प्रकार झाला. दमदाटी, शिवीगाळ आणि बघून घेण्याच्या धमक्या देण्यात आल्या.पण सत्य चव्हाट्यावर आणताना निर्भीड आणि वस्तुनिष्ठ तसेच आक्रमकतेचा बाज असलेल्या शिवगर्जना न्यूज मराठींने दबाव आणि धमक्यांना भीक न घालता चाललेला आक्षेपार्ह प्रकार थांबविण्यासाठी आपला पाठपुरावा चालूच ठेवला.
दरम्यान महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहिली. लाकडावर अंत्यंसंस्कार करण्याच्या आडून मृतांच्या नातेवाईकांना वेठीस धरून पैसे उकळण्याच्या चाललेल्या बोक्यांच्या खादाडखाऊ प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मृतांवर अंत्यंसंस्कार हे विद्युत आणि गॅस दाहनीत करण्याचे आदेश काढून त्याची ठोसपणे अंमलबजावणी सुरू केली.
अंत्यंसंस्कार करण्याच्या प्रकरणात स्मशानभूमींमध्ये चाललेला बाजार आता थांबू लागला आहे. ‘जगण्याने छळले होते अंत्यंसंस्काराच्या खर्चातून सुटका’ असा प्रकार झाला आहे हे माञ नक्कीच.
——

ठळक नोंद .
—-
नातेवाईकांसाठी समुपदेशन
कोरोना मृतांवर विद्युत आणि गॅस दाहनीत अंत्यंसंस्कार करण्याचे आदेश काढतानाच, आयुक्त पी.शिवशंकर यांनी नातेवाईकांना समूमदेशन करण्यास सांगितले आहे. लाकडावर अंत्यंसंस्कार करण्याऐवजी, विद्युत आणि गॅस दाहनीत अंत्यंसंस्कार करण्याबद्दल मृतांच्या नातेवाईकांना समजून सांगा, त्यांचे समदेशन करा असे आदेशात नमूद केले आहे, त्यानूसार, आयडीएच विभागात समूदेशन केले जात आहे.
——–
ठळक नोंद
——
‘माया’ उकळण्याचा उल्लेख,
‘शिवगर्जने’वर विश्वसार्हतेची मोहर
स्मशातभूमींमध्ये अत्यंसंस्कार करण्याच्या प्रकरणात पैसे उकळले जात आहेत, यासंबंधीच्या शिवगर्जना न्यूज मराठीच्या वृतांकनाचा परामर्श घेतला गेला.आदेशात पैसे उकळण्याच्या उल्लेख नमूद करण्यात आला. यावरुन ‘शिवगर्जना न्यूज मराठी’च्या वस्तुनिष्ठ आणि सत्य बातमीदारी वर आयुक्तांनी ‘विश्वसार्हते’ ची मोहर उमटवली.
—–
ठळक नोंद
—–
पोलीस कारवाईला मर्यादा,
चूरचूर कायमच राहिली
पैसे उकळण्याच्या चाललेल्या प्रकाराबाबत बोक्यांवर पोलीस कारवाई होणे गरजेचे होते.स्मशानभूमीतून त्यांची वरात पोलीस ठाण्यात निघायलाच हवी होती पण तक्रार देण्यासाठी एकही मायका का लाल पुढे झाला नाही.त्यामुळे पैसे उकळण्याच्या प्रकरणात थेट गुन्हे दाखल झाले नाहीत.त्याची मनातील चुरचुर कायम राहिली. जी लुटमार व्हायची ती कोरोनाच्या महामारीत वर्षभर झालीच.पुढचा प्रकार तेवढा रोखला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *