सराईत गुन्हेगार अजय नागमोडे येरवडा कारागृह येथे स्थानबद्द…

क्राईम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर

हब्बूवस्ती येथील सराईत गुन्हेगार अजय नागेश नागमोडे याला 1 वर्षासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

अजय नागेश नागमोडे(वय 26 रा. हब्बूवस्ती ) याच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गंगा नगर, मरिआई चौक,देगाव नाका,गौतम विद्यालय लक्ष्मी मंदिर या भागात जबरी चोरी, लोकांना धमकवाने शस्त्राने गंभीर दुखापत करणे, जमाव जमवून दगडफेक करणे, ग्रहअतिक्रमण करणे अश्या प्रकारचे 9 गंभीर गुन्हे दाखल असून 2018 मध्येही त्याच्यावर प्रतिबंधक
कारवाई करण्यात आली होती आरोपी अजय नागेश नागमोडे याच्यात गुन्हेगारी कृत्यात कोणताही बदल होत नसल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
सोलापूर शहरात अवैध व्यवसाय करणारे, समजवीघातक कृत्य, सामाजिक संतुलन बिघडवणाऱ्याची यादी तयार करण्यात आली असून ही कारवाई यापुढे सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *