सांगली पूरग्रस्तांसाठी सोलापूर महानगर पालिकाने दिला मदतीचा हात, सफाई कामगारांचे आणि अग्निशमन दलाचे पथक धावले मदतीला …

ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 27
सांगली पूरानंतर संभाव्य धोके निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर महानगर पालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करून पालिकेनी पूरग्रस्ता प्रती एक सामाजिक बांधिलकी जोपासत सांगलीकरांन करिता एक मदतीचा हात पुढे केला आहे.
सांगली पूरग्रस्ताकरिता पुरानंतर करण्यात येणा-या सफाई करिता सोलापूर महानगरपालिकेकडून मंगळवारी 40 सफाई कर्मचारी एक अग्निशमन दलाचे एक पथकास महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक चेतन नरोटे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक गणेश पुजारी, आदींच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मदतीच्या गाड्या सांगलीकडे रवाना करण्यात आले.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज, कुपवाड, रत्नागिरी, कोकण, चिपळूण अन्य तथा समुद्र किनारपट्टी लगतच्या जिल्ह्यांना पुराचा भयंकर फटका बसला आहे. आधीच कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि बेरोजगारीने ग्रासलेल्या जनतेला आता पुराशी सामना करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. निसर्गाच्या या आघातामुळे विस्थापित झालेल्या पूरग्रस्त लोकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. या उदात्त हेतूने सोलापूर महानगरपालिकेकडून एक सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या नात्याने त्यांना मदतीचा हात देऊया. पूरग्रस्तांना पूर्वपदावर आणण्याकरिता मदत पाठवली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या मार्फत सांगली परिसरात पूरा नंतर संभाव्य धोका निर्माण होऊ नये म्हणून सफाई कर्मचारी आणि सफाई साहीत्य पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर श्रीकांचन यन्नम यांनी दिली.आवश्यकतेनुसार यापुढे देखील सांगली पूरग्रस्तांना मदत केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *