सकल मातंग समाज आणि सत्यशोधक आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आण्णाभाऊंच्या जयंती निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय…

बातमी पुढची बातमी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 22

जगविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सत्यशोधक आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती समितीच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 1 ऑगस्ट 2021 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधी मध्ये विविध उपक्रमाचे आयोजन केले असून शालेय साहित्यवाटप, निबंध स्पर्धा, गरजूना हेल्थ इन्शुरन्स, लहान मुलांना खाऊ वाटप याबरोबरच समाजातील लहुकन्या कोमल शिंदे या आंतरराष्ट्रीय खेळाडूला ओलम्पिक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल धनादेशचं देण्यात येणार असून समारोप स्नेहभोजनाने होणार असल्याची माहिती सोलापूर शहर सकल मातंग समाजाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रारंभी सोलापूर शहर सकल मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात मातंग समाजवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, समाजाचे विविध प्रश्न या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात सकल मातंग समाज या संघटनेची स्थापना करण्यात आली असून मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम सकल मातंग समाज करणार आहे.

या पत्रकार परिषदेला सकल मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे, कार्याध्यक्ष सुरेश पाटोळे, मध्यवर्ती समिती उत्सव अध्यक्ष रोहन कामने,विकास कसबे, समाधान आवळे, रोहित खिलारे, रोहन लोंढे, उमेश मस्के,गुड्डू शिंदे आदि उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *