सनसनाटी वृत्ताची व्हीडिओ क्लीप प्रचंड व्हारल ! कोविडग्रस्त पत्रकार महेश कदमांना इंजेक्शन देऊन संपविण्याची धमकी … सोलापूरातील नर्मदा हॉस्पिटलवर आरोप, हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात… मरणाच्या भितीने कदम यांचे पलायन, हाॅस्पीटलने आरोप फेटाळून लावत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पञकारावर केला गुन्हा दाखल ..नर्मदा हाॅस्पीटल माजी आमदार दिलीप मानेंचे असल्याची चर्चा

मोस्ट लोकल न्यूज

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दिनांक २८
काटी तालुका तुळजापूर येथील महाराष्ट्र न्यूज चॅनलचा पत्रकार – संपादक महेश कदम यांना
इंजेक्शन देऊन कायमचा काटा काढण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आणि सनसनाटी आरोप कदम यांनी काल एका व्हिडिओद्वारे केला आहे. सोलापुरातील डफरीन चौक परिसरातल्या नर्मदा हॉस्पिटलचे व्यवस्थापक विजय रुपनर यांनी ही धमकी दिल्याचा आरोप या व्हिडीओ मधून कदम यांनी केला आहे.
या दवाखान्यातून मला डिस्चार्ज देत नाहीत, माझ्या प्रकृतीमध्ये कसलाही फरक पडलेला नाही. दहा ते पंधरा लोकांचा या हॉस्पिटलमधील स्टाफ माझ्या अंगावर मारायला येतो, असाही आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे या सनसनाटी वृत्तासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या प्रकरणात नर्मदा हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.हे हॉस्पिटल माजी आमदार दिलीप माने यांचे असल्याची चर्चा आहे.
दरम्यान संपादक महेश कदम यांनी केलेले आरोप हे रुग्णालयाने फेटाळले असून महिलेचा विनयभंग करून रुग्णालयातून पलायन केल्याबद्दल कदम यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.
या प्रकरणासंदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन हॉस्पिटलची बाजू मांडणार असल्याचे नर्मदा हॉस्पिटलचे व्यवस्थापक विजय रूपनर यांनी सांगितले. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात माहिती मिळाली असून या प्रकरणाची चौकशी होईल आणि चौकशीचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर होईल असे महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले आहे.
—–
ठळक नोंद
———
* संपादक कदम यांनी केलेले नर्मदा हॉस्पिटलवर केलेले आरोप

– २२ एप्रिलला दवाखान्यात दाखल झाल्यापासून माझ्या प्रकृतीमध्ये कसलाही फरक पडलेला नाही
– या हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार होत नाहीत,
– केवळ पैसे भरायला सांगितले जातात
– ऑक्सीजन पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये, व्हेंटिलेटर सुविधा हवी असेल, तर दोन लाख रुपये ,औषध गोळ्या पाहिजे असतील तर दहा हजार रुपये द्या अशी पैशांची मागणी केली जाते
* पाचशे रुपयांची वस्तू मागायची असेल तर दोन हजार रुपये मागितले जातात
* डॉक्टर भेटत नाहीत, टॉयलेट आणि बाथरूममध्ये पाणी नाही
* व्यवस्थापक विजय रूपनर यांच्याकडे तक्रार केली तर तक्रार ऐकून घेतले जात नाही
* राहायचे असेल तर रहा, अन्यथा निघून जा असे सांगितले जाते
* आम्ही इंजेक्शन देऊन तुझ्यासारखे अनेकांना मारले आहे
* तुला उपचार घ्यायचे असतील तर घे, आमच्या हॉस्पिटलचे काही वाकडे करू शकत नाही अशी भाषा वापरली जाते
* हॉस्पिटल मधील दहा ते पंधरा लोकांचा स्टाफ घेऊन मारायला अंगावर येण्याचा प्रकार झाला
——
ठळक नोंद
——
कदमांचे जिल्हाधिकारी यांना साकडे
पत्रकार कदम यांनी नर्मदा हॉस्पिटलकडून होत असलेल्या अन्याय संदर्भात आणि आपल्याला उपचार मिळण्यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना या व्हायरल व्हिडिओतून याचना केली.
—-
ठळक नोंद
—-
कदम यांनी या हॉस्पिटलमध्ये आपणास प्रकृतीला फरक पडत नाही त्याशिवाय मरणाची भीती आहे असं व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितला आहे हा व्हिडीओ आपण हॉस्पिटलमध्ये बनवला असून काही नाही फरक पडल्यास दुसरा व्हिडिओ बनवू असेही सांगितलं होते. दरम्यान कदम यांनी हॉस्पिटलमधून पोबारा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *