विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

ग्राउंड रिपोर्ट

शिवगर्जना न्यूज मराठी
दक्षिण सोलापूर,
नंदकुमार वारे,
सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असून वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोलापूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम सध्या युध्दपातळीवर चालू आहे या महामार्गावर सोरेगाव, हत्तूर, वडकबाळ, होनमुर्गी, तेरामैल(बसवनगर),नांदणी,टाकळी(ब्रीज) ही गावे वसलेली आहेत शिवाय मंद्रुप, भंडारकवठे,कंदलगाव,निंबर्गी माळकवठा या सारख्या मोठ्या गावांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर दररोज हजारो वाहनधारक आपली दुचाकी आणि चारचाकी वाहनात ये-जा करीत असतात.
या महामार्गावरील रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी मोठ-मोठे
खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे, खड्डा चुकविण्याच्या नादात या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत, रस्त्यावर पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. रात्री अपरात्री या भागातला शेतकरी आपल्या शेतातून भाजीपाला घेऊन सोलापूर शहरात येण्यासाठी धडपडत असतो.
रस्त्यावर पडलेल्या भयानक खड्ड्यांमुळे धडपडत येणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याची बरेवाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी सोलापूर -विजयपूर राष्ट्रीय महामार्गाकडे संबंधित अधिकारी वेळीच लक्ष घालून अपघाताला निमंत्रण देणारे,ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *