रमाई आवास योजने अंतर्गत खाजगी झोपडपट्टी धारकांना ही लाभ देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलाय…

बातमी पुढची बातमी

शिवगर्जना न्यूज मराठी

सोलापूर दि 17

सोलापूर शहरातील आमराई, आवसेवस्ती, थोबडे वस्ती, देशमुख पाटील वस्ती, धूम्मा वस्ती येथे मोठया प्रमाणात गेल्या 50 वर्षांपासून अनुसूचित जातींचे कुटुंब मोठया प्रमाणात राहत असून येथील लाभार्थ्यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असून सुद्धा त्या भागात खाजगी झोपडपट्टी असल्याने येथील नागरिकांना लाभ मिळत नाही. तरी शासनाच्या निर्णयानुसार खाजगी व मालकी हक्क असलेल्या झोपडपट्टी मध्ये रमाई आवास योजना राबविण्यासाठी सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांना आदेश देण्यात यावा व वंचिताना रमाई आवास योजना अंतर्गत हक्काचं घरं मिळावं अश्या मागणीच निवेदन एकात्मता बहुउद्देशीय सामाजिक संस्थचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिराळकर यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *