पोलीस अधीक्षक यांचा डिझेल माफियांना दणका, सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी…

ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी

सोलापुर/ टेंभुर्णी

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंदयाचा आढावा घेवून कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध धंदयावर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विशेष पथकाची नेमणूक केली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर येथील कोल्हे वस्तीमधील शेतात अवैधरित्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांचे पथक टेंभूर्णी भागात असताना त्यांना तात्काळ कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. सपोनि मांजरे व त्यांचे पथक खाजगी वाहनाने मौजे टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर येथील कोल्हे वस्ती मधील शेतात जावून पाहणी केली असता सदर ठिकाणी जमीनीतील खड्डयात लाल रंगाची 16 हजार लिटर लोखंडी टाकी त्यामध्ये सुमारे 50 लिटर डिझेलचा वास येत असल्याचे दिसून आले. तसेच लगतच्या दुस-या खड्डयात डिझेल सारखा वास येत असलेलीएक पांढरे रंगाचे 12 हजार लिटर लोखंडी टाकी, एक लाल रंगाचे महिंद्रा अर्जुन कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर हेड, एक केसरी रंगाची टॅंकर टाकी तिची मागील बाजूस डिझेल मोजण्यासाठी मीटर, पाईप व मोटार असलेली ट्राॅली, 6 प्लास्टीक व लोखंडी बॅरेल, दोन्ही बाजूस पाईल लावलेली टिल्लू मोटार इत्यादी वस्तू दिसून आल्या.
त्यानंतर सपोनि रवींद्र मांजरे यांनी माढा तहसील कार्यालय येथे संपर्क करून सदरबाबत माहिती आवगत केली असता माढा तहसीलदार यांने आदेशान्वये पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड, मंडल अधिकारी व कोतवाल हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी सदर ठिकाणची पाहणी करून रितसर कारवाई करून सदर साहित्य ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई केली.

या ठिकाणाहून जमिनीतील खड्डयात ठेवलेल्या 02 लोखंडी डिझेल टाक्या, 01 महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर हेड, 06 प्लास्टिक व लोखंडी बॅरेल, 01 टॅंकर टाकी, 1 टिल्लू मोटार, 50 लिटर डिझेल इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आले असून एकूण 07 लाख 09 हजार 500 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर बाबत मिळून आलेल्या 02 इसमांविरुद्ध टेंभूर्णी पोलीस ठाणेस गुरंन 119/2021 अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, निलकंठ जाधवर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच माढा तहसील कार्यालय येथील पुरवठा अधिकारी व त्यांचे स्टाफ यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *