मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

अर्थकारण उद्योग ऑन दि स्पाॅट रिपोर्ट क्राईम खेळ ग्राउंड रिपोर्ट जरा हटके न्यूज बातमी पुढची बातमी बातमी मागची बातमी बिग ब्रेकिंग ब्रेकिंग मोस्ट लोकल न्यूज राजकीय शिवगर्जना नेटवर्क स्पेशल शेती सहकार स्टोरीज

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळी 11 ते 1 या वेळेत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत प्लाझा सिनेमा, दादर, वरळी नाका, लालबाग, विलेपार्ले, गिरगाव, विक्रोळी, घाटकोपर अशा एकूण 18 ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा आरक्षण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात शनिवारी संध्याकाळी बैठक पार पाडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याचेही समजते.

राज्यात पोलीस भरतीची घोषणा केल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मराठा बांधव आणि विरोधी पक्ष भाजपकडून सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यात येतोय.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतरच ठाकरे सरकारने पोलीस भरतीची घोषणा का केली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळातील सदस्य, उपसमिती यांच्यासोबत कायदेतज्ज्ञांच्या बैठका घेतल्या आहेत. यापैकी काही बैठकांवर मराठा क्रांती मोर्चाकडून बहिष्कारही टाकण्यात आला.

मराठा आरक्षणासंदर्भात नवीन अध्यादेश काढण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली होती. पण याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *