स्वीय सहाय्यक माळगे खासदार महास्वामींसाठी ठरले डोकेदुखी !केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत ‘माळगें’ ची ‘हात’चलाखी…खासदार शिवाचार्य यांना अंधारात ठेवून यादीत स्वतःच्या मर्जीतील घुसडली नावे… पालकांमधून संताप

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. १
श्रीकांत माळगे. सोलापूर भाजपाचे खासदार डाॅ‌. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा ‘अप्रशिक्षीत’ स्वीय सहाय्यक. जणू आपणच खासदार आहोत या अर्हिभावात वागणारा असाच तो स्वीय सहाय्यक. मंञी, खासदार आणि आमदार यापैकी यापूर्वी कोणाकडेदेखील स्वीय सहाय्यक पदावर काम केल्याचा ‘काडीचाही’ अनुभव नसलेला हा पठ्ठ्या.
भाजपाचे सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे कधी काळी श्रीकांत मेलगे यांचा भाऊ सेंकड स्वीय सहाय्यक म्हणून कामाला. हाच संदर्भ घेऊन श्रीकांत माळगे हे खासदार महास्वामींकडे स्वीय सहाय्यक म्हणून चिटकलेले.
माञ हे माळगे स्वीय सहाय्यक भाजपाच्या गोटासह आता खुद्द खासदार महास्वामींनादेखील डोकेदुखी ठरत असल्याची चर्चा आहे. स्वीय सहाय्यक म्हणून त्यांच्या कारभाराची डोकेदुखी सर्वांनाच ठरत असल्याला बोलबाला आहे. तशा प्रचंड तक्रारी आहेत.
खासदार महास्वामी यांच्या खासदार निधीमधील कामांपासून ते केंद्रीय विद्यालयातील कामांपर्यंत माळगे यांच्या मनमानी कारभाराची सुसाट एक्सप्रेस मागील कित्येक दिवसांपासून सुटत आहे. खुद्द महास्वामी यांना राजकीय क्षेञातील कसलाच अनुभव नसल्याने माळगेंचे फावत असल्याचे अनेकजण बोलून दाखवत आहेत. ‘माळगे सांगे अन् महास्वामी डोले’ असाच प्रकार या दोघांच्या कारभारात आहे.
खासदार यांच्या स्वीय सहाय्यकासाठी पाञतेचे काही निकष आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे, उत्तम संभाषण कौशल्य असावे. टायपिंग, लघूलेखन तसेच संगणक हाताळण्याची किमया असावी. पदवी अथवा पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण असावे.मतदारसंघाच्या अनुषंगीक सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
दरम्यान हे सर्वसाधारण निकष लक्षात घेता, माळगे हे निकषात अत्यंत खुजे आहेत. वेगाने संगणक हाताळणे, लघूलेखन याच्या त्यांना मर्यादा आहेत, लघूलेखन तर अजिबात येत नाही. इंग्रजी आणि हिंदी भाषेतून ते अस्लखीत संवादच साधू शकत नाहीत. सहा विधानसभेचा मतदार संघ असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाची त्यांनी माहितीदेखील नाही. एका दैनिकाच्या आॅफिसमध्ये मामुली कारकून ते वार्ताहर ( वार्ताहर म्हणून अधिकृत नियुक्ती नसावी ) या पदावरून निलंबित असलेल्या माळगे यांना कोणत्या निकषांवर खासदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून नेमले हाच संशोधनाचा विषय आहे.
स्वत:ला खासदार समजणारे माळगे हे केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत मागच्या काही वर्षांत ‘हात’ चलाखी करीत असल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारी आहेत. खासदार महास्वामी यांनी प्रवेशासाठी दिलेल्या नावात बदल करुन स्वत:च्या मर्जीतील नावे घुसडून माळगे हे हातचलाखी करीत आपले भागवून घेत असल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जात आहेत.
केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत माळगे हे ‘मॅनेज’ प्रवेश मिळवून देत आहेत, अशाही तक्रारी पालकांच्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात खुद्द महास्वामी यांनी गतवर्षी माळगे यांना झापले होते. तरीही ‘मॅनेज’ प्रवेश देण्याची माळगे यांची कारभाराची पद्धत सुरूच आहे, यावरून पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. खासदार महास्वामी यांनी सांगूनदेखील, माळगे हे स्वतःच्या मर्जीनुसार प्रवेश शिफारशीच्या यादीत बदल करतात हे कसे काय? असा सवाल उपस्थित करतानाच माळगे आणि महास्वामी हे ‘तू कर मारल्यासारखे मी करतो रडल्यासारखे’ या प्रमाणे दोघांचा केंद्रीय विद्यालय शाळा प्रवेश प्रक्रियेत कारभार सुरू असल्याही चर्चा सुरू आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे श्रीकांत माळगे यांच्या केंद्रीय विद्यालयातील प्रवेश प्रक्रिययेसंबंधीच्या ‘ मॅनेज’ प्रवेशाच्या कारनाम्यांबाबत खासदार महास्वामी यांच्याकडे तक्रारी केल्या तरी ‘मी माळगेंना सांगतो, एवढेच उत्तर खासदारांकडून दिले जात असल्याचे पालक सांगत आहेत.
केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया दरम्यान माळगे यांचा जो आक्षेपार्ह कारभार सुरू आहे, त्या संदर्भात कोठे न्याय मागता येईल? यासाठी काही पालक कायदेतज्ञ किंवा ‘लाल’ फितीच्या कारभारामधील अधिकारी यांच्याकडून अभिप्राय घेण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *