मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीकडून ०४ मोबाईल जप्त…

क्राईम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर (प्रतिनिधी)
मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करून ४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.फिर्यादी माज अन्वर हुसेन बागवान(वय-२६ वर्षे, रा.९४/२४.रहिमत प्लाझा,जोडभावी पेठ,सोलापूर) यांच्या राहत्या घरातून दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ०६.४५ ते ०९.०० वा.दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करुन घरामध्ये ठेवलेले तीन मोबाईल एकूण किंमत १८,००० रुपये हे घरामध्ये प्रवेश करुन चोरुन घेवून गेल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता.तांत्रिक माहिती तसेच गोपनिय बातमीदारामार्फत,यातील आरोपी हा खाजा नगर,मोमीनपुरा,बीड येथील रहिवाशी असून त्याने चोरी केल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.
या अनुषंगाने वरिष्ठांची परवानगी घेवून पोउपनि/ दाईंगडे,डी.बी.पथक प्रमुख सोबत पोना साठे,पोना बर्डे असे मिळून बीड येथे गेले.त्यानंतर संशयीत आरोपी हा बार्शी नाका,बीड येथे चौकामध्ये येणार असल्याचे सांगितले.पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याकडे एकूण ०४ मोबाईल मिळून आले व त्याने ते मोबाईल सोलापूर येथून चोरी करून आणल्याची कबुली दिली.जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचे चार मोबाईल जप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *