लिफ्ट मागून पीकअपमध्ये बसलेल्या तीन महीलांनी सव्वातीन लाखाला लुटले…

क्राईम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

विरवडे बु / प्रतिनिधी
शेटफळ जवळील संकेत हॉटेल जवळ रस्त्यावर एका वाहनाला अडवून त्यात मला पुढच्या गावाला नेऊन सोडा असे म्हणत तीन महिला बसल्या आणि ड्रायव्हरने पाठीमागे बसा असे म्हणत असताना त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या गाडीतील 3लाख 20हजार रुपये चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे
याबाबत पोलिसांनी सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद धारूल हा शेळ्या मेंढ्या चा व्यापारी आहे. आज नेहमीप्रमाणे स्वतःचे चारचाकी वाहन नंबर ए एक्स 9014 या पिकप मधून चालक सुलतान रमजान तांबोळी असे दोघे जण करमाळा येथे शेळ्या आणण्यासाठी निघाले होते त्यांनी रियाज धारूल अब्दुल महाडिक या व्यापाऱ्याकडून आणि स्वतः जवळची काही रक्कम अशी मिळून तीन लाख वीस हजार रुपये घेऊन करमाळा कडे निघाले होते. वाटेत शेटफळ जवळील संकेत हॉटेल जवळ आले तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन महिला व सोबत दोन लहान मुले यांनी या पिकअपला हात करून थांबवले आणि आम्हाला मोडनिंब येथे जावयाचे आहे असं म्हणून त्यांना दरवाजा उघडून आत बसण्यास सांगितले त्या वेळी दोन महिला पिकअपमधील पुढच्या सीटवर बसल्या आणि एक खालीच थांबली त्यांना पाठीमागे बसा असे म्हटले असता त्यांनी आम्हाला जावयाचे नाही असे सांगितले त्याच वेळी पुढे बसलेल्या महिला देखील खाली उतरल्या. आणि आम्ही पुढे निघून गेलो काही अंतरावर गेल्यावर अरण (ता माढा ) या गावाजवळ गेल्यावर चालकाने मालकाला पैसे आहेत का ? असे विचारणा केली तेव्हा गाडीच्या ड्रॉवरमध्येठेवलेले 3 लाख २० हजार रुपये तेथें नसल्याचे त्यांना आढळले. त्यांनी लगेचच महिला ज्या ठिकाणी सोडल्या त्या ठिकाणी येऊन पाहिले असता तेथे कोणीही नव्हते
त्यांनी तडक मोहोळ पोलिस स्टेशनला येऊन पैसे चोरीची फिर्याद दिली. या घटनेचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *