लहुजी शक्ती सेना सोलापूर शहर-जिल्हाच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 52 व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली…

बातमी पुढची बातमी

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 18

जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले यांनी आण्णाभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला. आण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या शाहिरीतून रशियात सांगणारे पहिले शिवशाहीर होते.संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाचे योगदान देऊन दलित, शोषित, उपेक्षित,कामगार यांच्यासाठी लढा उभा केला . दीड दिवसाची शाळा शिकून कथा, कादंबरी, पोवाडे लिहून जगापुढे आदर्श निर्माण केला अश्या थोर महामानवाला मानाचा मुजरा असे मनोगत भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.
लहुजी शक्ती सेनेचे कोअर कमिटी जिल्हाध्यक्ष वसंत देडे, रजनी डोलारे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष,शहर अध्यक्ष संजय आडगळे
युवक अध्यक्ष योगेश सोनवणे,शहर कार्याध्यक्ष बालाजी घोडके, जिल्हा कार्याध्यक्ष शशी डोलारे,शहरउपाध्यक्ष आनंद कांबळे, उत्तर तालुकाध्यक्ष शाम उडानशिवे, उपाध्यक्ष सोमनाथ पात्रे,सतिश बनसोडे, लखन पवार,युवक तालुकाध्यक्ष अक्कलकोट धर्मेद्र आवळे, आजय मोहीते,नितिन बनसोडे, सागर मोहिते, सुरज मोहिते आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *