कोरवली गावाजवळ अपघात एक ठार, एक जण गंभीर जखमी…

क्राईम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
विरवडे बु दि 18
मोहोळ तालुक्यातील कोरवली हद्दीत रविवार दिनांक अठरा रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ ते मंद्रूप हायवेवर जाधव यांच्या वस्ती जवळ अपघात होऊन एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

कामती ते कंदलगाव रोडवर मोटर सायकल क्रमांक एम.एच.१३ डी.जे. १३५४ या मोटरसायकला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील चालक बळवंत लक्ष्मण वाघमोडे रा. गावडेवाडी हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र महादेव धारु गावडे रा. गावडेवाडी ता. दक्षिण सोलापूर हा जखमी अवस्थेत रोडच्या कडेला पडला होता.

या अपघातातील जखमीला हॉस्पिटल सोलापूर कडे नेत असताना कोरवली जवळ रुग्णवाहिकेतून अचानक धूर येत असल्याने खाजगी वाहनाने तात्काळ जखमीला सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. सदर मयत यास प्राथमिक आरोग्य केंद्र कामती येथे आणून शवविच्छेदन करून सदरचे मयत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्यातील अज्ञात ट्रक व त्यावरील अज्ञात चालकाचा शोध कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन माने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *