अंत्यसंस्कारांच्या खर्चाआडून लाखो रुपयांची ‘माया’ उकळणाऱ्या टोळीची मास्टर माईंड कविता चव्हाण…अंत्यसंस्कारांची बिलं टायगर ग्रुप फेम कविता चव्हाण हिच्या ‘केअर आॅफ पीस’ या दुसऱ्या संस्थेच्या नावे, लुटारू टोळीकडून पैसे उकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या, लुटारू टोळीला महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘वरदहस्त’

शिवगर्जना नेटवर्क स्पेशल

कोरोना महामारी
पंचनामा भाग – ३
——–
शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि.२१
शिवाजी भोसले / रवि ढोबळे
————
सोलापूरातील कोरोना महामारीत अंत्यसंस्काराच्या खर्चाआडून दररोज लाखो रुपयांची बक्कळ ‘माया’ उकळणाऱ्या टोळीची मास्टर माईंड कविता चव्हाण हीच असल्याची माहिती समोर येत असून पैसे उकळण्यासाठी या टोळीकडून विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत असा मोठा बोलबाला शहरात आहे.
टायगर ग्रुप फेम कविता चव्हाण हिच्याच ‘केअर ऑफ पीस’ या दुसऱ्या संस्थेच्या नावे अंत्यसंस्काराची बिलं महापालिकेकडून निघत असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. या लुटारू टोळीला महापालिकेतील एका बड्या चमको अधिकाऱ्यासह साखळीतील अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ‘वरदहस्त’ असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे.
विशेषत्वे, मृतांवर अंत्यसंस्कार करण्याच्या खर्चाची बिलं महापालिकेकडून केअर ऑफ पीस या संस्थेच्या नावावर घेतानाच, दुसरीकडे कविता चव्हाण हिच्या टोळीकडून अंत्यसंस्कारांच्या खर्चाआडून लाखो रूपयांची ‘माया’ जमविण्यासाठी विविध ‘क्लुप्त्या’ वापरल्या जात आहेत असं मृतांचे नातेवाईक सांगत आहेत, त्याशिवाय शिवगर्जना न्यूज मराठीच्या स्टींग ऑपरेशन मधून हे विदारक चित्र दिसून आलं आहे.
अंत्यसंस्कारांसाठी प्रेतं खुप आहेत, अंत्यसंस्कार होण्यासाठी दोन – तीन दिवस लागतील तोपर्यंत प्रेत तसंच ठेवणार का? जास्त दिवस झालेल्या प्रेताला आम्ही पुन्हा हात लावत नाही,प्रेताची नीट विल्हेवाट नाही लागली तर कसं? प्रेताची विटंबना होईल, महापालिकेच्या माणसांकडून नीट अंत्यसंस्कार होत नाहीत, प्रेत जाळायला लाकडं कमी वापरतात, त्यातुन प्रेत अर्धेच जळते, कुञी प्रेताला ओढून घेऊन जातात, प्रेताची विटंबना होते, तिसऱ्या दिवसाच्या विधीसाठी प्रेताची राख मिळणार नाही असे विविध कांगवे सांगून मृतांच्या नातेवाईकांना भावनिक करून त्यांच्या दु:खाचा व असहायतेचा फायदा उठवत या टोळीकडून ‘माया’ कमविण्याचं इप्सित साध्य केलं जात असल्याला बोलबाला आहे.
या टोळीने अंत्यसंस्कारांचे रेट पाडले आहेत. सोलापूर शहरातील प्रेतासाठी दहा ते पंधरा हजार तर जिल्ह्यातील माणसासाठी १५ ते २५ हजार असा रेट आहे.
कोरोनाने मृत झालेली व्यक्ती नेमकी कुठली आहे? ती कोण होती ? तिच्या घरची परिस्थिती कशी आहे ? नातेवाईक कसे सुटा – बुटातील धनवान दिसतात का? याचा अंदाज काढून अंत्यसंस्काराचा रेट ठरवला जात आहे.
आजवर नेहमीच जागल्याची भूमिका ठेवणाऱ्या आणि चांगलं खांद्यावर घेतानाच, वाईट पायदळी घेणाऱ्या ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ च्या स्टिंग ऑपरेशनमधून हे जळजळीत सत्य समोर आलं आहे.
शववाहिका चालक आणि टोळीमधील कार्यकर्ते यांच्या ‘अभद्र’ युतीमधून मृतांच्या नातेवाईकांना लुटण्याचा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहे असं कळतं.
उल्लेखनीय बाब म्हणजे कोरोना महामारीपूर्वी मृतांवर सेवाभावी वृत्तीनं अत्यंसंस्कार करणारी लादेन यांच्याकडील सात ते आठ जणांची गॅंग कविता चव्हाण यांच्या टोळीला मिळाली असून सेवाभावी वृत्तीमधुन अंत्यसंस्कार करत पुण्यकर्म पदरात पाडून घेण्याऐवजी, या गॅंगनं दररोज हजारो रुपयांची ‘माया’ कमविण्यात धन्यता मानल्याची चर्चा आहे.
हायलाईट
————
व्हीडीओ आणि फोटो कॅमेऱ्यांचे फ्लॅश पडण्यावेळीच म्हणे कविता दिसते अंत्यसंस्कारात!
जून २०२० मध्ये सेवाभावी वृत्तीच्या धर्मामधून कविता चव्हाण ही अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे सरसावली.माञ जूलै २०२० मध्ये अंत्यंसंस्काराच्या खर्चाची महापालिकेतून आलेली बिलं वाटून घेण्यावरून तिने मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात प्रसिद्ध असलेल्या ‘लादेन’ सोबत वाद केला. या दरम्यान लादेन ग्रूप मधून बाहेर पडून कविता हिने मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आपला सवतासुभा निर्माण केला.’केअर आॅफ पीस’ ही संस्था त्यातुनच तिने काढली अशी माहिती मिळाली. समाज सेवा, सेवाभावी वृत्ती यामधून आपण मृतांवर अंत्यसंस्कार करीत आहोत, आपण कोरोनायोध्दे आहोत असं सांगणारी कविता ही केवळ फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरणावेळीच मृतांना हात लावते. अंत्यंसंस्काराचा ती दिखावा करते, इतर वेळी अंत्यंसंस्काराला ती कधीच नसते. केवळ हिशोब आणि बाॅसगिरी करते असा आरोप तिच्यावर आहे.
——————————
हायलाईट
——–
करमाळ्याच्या ‘बाबा’ चा सोलापूरात रूबाब
कविता चव्हाण हिच्या टोळीमध्ये ‘बाबा’ नावाचा ‘वजनदार’ व्यक्ती आहे म्हणे. मुळच्या करमाळ्याच्या या बाबाचा सोलापूरात रुबाब आहे म्हणे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये हाच बाबा प्रेतं आणि त्यांचे नातेवाईक शोधत सेंटींग लावत फिरतो अशी चर्चा या हाॅस्पीटलच्या वर्तूळात आहे.हाच बाबा महापालिकेत रुबाबात भटकतो.अत्यंसंस्काराची बिलं काढण्यासाठी रूबाब दाखवतो असं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *