जादा भाडे घेवून लुटमार केल्यास रूग्णवाहिकेचा परवाना होणार रद्द आरटीओंचा रूग्णवाहिका चालकांना कारवाईचा सज्जड दम,रूग्णवाहिका चालकांकडून होणार्‍या लुटमारीला आरटीओंचे ‘ब्रेक’… कोरोना महामारीतील सेवेसाठी ॲम्बुलन्सचे भाडेदर केले निश्‍चित ‘शिवगर्जना न्यूज मराठीच्या बातमीचे पडसाद’

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी
सोलापूर दि.25
———
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना साथीच्या उदभवलेल्या कठीण प्रसंगी कोरानाग्रस्त रुग्णांना रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देताना, खासगी रूग्णवाहिका चालकांकडून मनमानी पध्दतीने भाडे घेवून रूग्णांच्या कुंटूंबीयांची मागच्या अनेक दिवसांपासून लुटमार सुरु असून ही लुटमार थांबवण्यासाठी रूग्णवाहिकांसाठी सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दर निश्‍चित करताना, जादा भाडे घेणार्‍या रूग्णवाहिकेच्या संदर्भात आरटीओ कार्यालयाकडे तक्रार केल्यास या संबंधीत रूग्णवाहिकेचा परवाना रद्द करू असा कारवाईचा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
कोरोना महामारीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काही खासगी रूग्णवाहिका चालक तसेच मालक हे मनमानी पध्दतीने भाडे घेवून रूग्णांच्या कुंटूंबीयांना जादा भाड्यासाठी वेठीला धरतानाच, कुंटूंबीयांच्या असहायतेचा फायदा घेवून जादा भाडे घेण्यातून लुटत आहेत. कोरोना परिस्थितीमधील या विदारक आणि रुग्णांच्या कुंटूंबीयांन होणार्‍या आर्थिक आणि मानसिक ञासाबद्दल ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ने सोलापूरच्या आरटीओंचे लक्ष या प्रकरणावर वेधले होते. पुण्यात असा पटर्न राबविण्यात येत आहे. सोलापूरातदेखील तो राबविण्यात येतोय.
——-
ठळक नोंद
——-
रूग्णवाहिकेची सेवा देताना, काही खासगी रूग्णवाहिका चालकांकडून जादा भाडे घेतल्याबद्दलच्या तक्रारी आहेत. रूग्णवाहिकांसाठी भाड्याचे दर निश्‍चित करून देत आहेत, या दराप्रमाणेच भाडे घेण्यासंबंधी रूग्णवाहिका चालक व मालकांना सांगत आहोत. रूग्णवाहिका सेवेसाठी कोणी जादा भाडे आकारल्यास रूग्णवाहिकेच्या नंबरसह आरटीओ कार्यालयाकडे तक्रार करावी, संबंधीत रूग्णवाहिकेचा परवाना रद्द करू. कोरोना महामारीत रूग्णांना रूग्णवाहिकेची सेवा अत्यंत चांगली मिळावी यासाठी नियंत्रक म्हणून आरटीओ कार्यालय सजग आहे.
संजय डोळे
(उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर)
——–
ठळक नोंद
—————
या भ्रमणध्वनी क्रमांकावर करावी तक्रार
————–
आरटीओंनी निश्‍चित करून दिलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे घेवून कोणी ञास देत असेल तर त्या संबंधीत रूग्णवाहिकेचा नंबर कळवून तक्रार द्यावी. 9545529997 या भ्रमणध्वनी क्रमांकावर तक्रार करावी. तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.
————-
ठळक नोंद
रूग्णवाहिकेसाठी निश्‍चित केलेले भाड्याचे दरआरटीओने जारी केलेल्या दरपत्रकानुसार रुग्णवाहिका असलेल्या मारूती गाडीसाठी दर २५ किलोमीटरला किंवा २ तासासाठी ५०० रुपये, प्रतिकिलोमीटरसाठी ११ रुपये आणि प्रतिक्षेसाठी दर तासाला १०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तसेच टाटा सुमो, मेटोडोर रुग्णवाहिकेसाठी दर २५ किलोमीटरसाठी किंवा २ तासासाठी ६०० रुपये, प्रति किलोमीटरसाठी १२ रुपये आणि प्रतिक्षेसाठी दर तासाला १२५ रुपये, त्याचप्रमाणे टाटा ४०७, स्वराज माझदा इत्यादी चॅसिसवर बांधणी केलेल्या रुग्णवाहिकेसाठी दर २५ किलोमीटरला किंवा २ तासासाठी ९०० रुपये, प्रति किलोमीटरसाठी १३ रुपये आणि प्रतिक्षेसाठी दर तासाला १५० रुपये
————
अन्य काही ठळक नोंदी
—–+
* निश्चित केलेले भाडेदर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी लागू आहेत
* भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी आहेत. २५ किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रति तास प्रमाणे भाडे वाढ होईल. प्रतिक्षादर लागू राहतील.
* हे दरपत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे.
* वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरीता प्रतिक्षा दर लागू राहतील.
* प्रस्तावीत केलेल्या कमाल भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारात येणार नाही.
* रुग्णवाहिकेला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे.
* प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
* मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू राहतील.
* सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित असल्याचे ग्राह्य आहे. तसेच आवश्यकतेनुसार किंवा रुग्णाच्या विनंतीनुसार वातानुकूलित यंत्रणा चालू अथवा बंद ठेवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *