ब्रेकिंग!गुन्हे शाखेची दमदार कारवाई मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी केली जेरबंद, 31 मोटार सायकल सह 13 आरोपीना अटक 11 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 15

सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हे दाखल झाले होते.या अनुषंगाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर यांनी चोरीस गेलेल्या मोटर सायकलचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले होते.

सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे व त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी दहा दिवसाची चोरीस गेलेल्या मोटर सायकलची शोध मोहीम राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदे पेट्रोलिंग करत असताना चोरीस गेलेली काळ्या रंगाची हिरो कंपनीची विना नंबर मोटारसायकल विक्री करण्यासाठी आरोपी रमेश रेवणसिद्ध बळुरगी (वय 21 मु. पो मंगरूळ रा.अक्कलकोट जि. सोलापूर ) हा आसरा चौक मार्गे शहरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मोठ्या शिताफीने सापळा रचून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडून गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली.
आरोपी रमेश रेवनसिद्ध बळुरगी याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदार मंगेश राजू आंबेकर व नामदेव बबन चुनाडे दोघे रा.पंढरपूर यांच्या मदतीने सोलापूर शहर,सोलापूर ग्रामीण,कुर्डूवाडी,पंढरपूर, पुणे,तुळजापूर, लोनंद,सासवड, सातारा अशा विविध जिल्ह्यातून 18 मोटर सायकल चोरी केली असल्याचे कबूल केले.
गुन्हे शाखेने मोठया शिताफीने उत्कृष्ट तपास करून 18 मोटार सायकल हस्तगत केल्या व आरोपीना अटक केलं आहे. आरोपी नामदेव बबन चुनाडे हा फरार असून याचा शोध सुरु आहे सदर गुन्ह्यातील आणखीकाही मोटार सायकल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली.
याबरोबरच गुन्हे शाखेने राबवलेल्या मोहीमेत चोरीस गेलेल्या मोटर सायकल हस्तगत केल्या आहेत.गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांच्या पथकाने 5 मोटर सायकल, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार यांच्या पथकाने 1 मोटर सायकल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या पथकाने 2 मोटर सायकल,पोलीस सब इन्स्पेक्टर शैलेश खेडेकर यांच्या पथकाने 1 अशा एकूण 31 मोटरसायकल व 11 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्या आहेत.
आरोपीचे नावे खालील प्रमाणे
1)शिवानंद म्हेत्रे(वय 38 रा,सुनील नगर midc,सोलापूर),
2)जमीर शेख वय 23 (रा राहुल गांधी झोपडपट्टी,सोलापूर)
3)शिवा कांची(वय 21,रा विडी घरकुल)
4)राजू कुडक्याल (रा.विडी घरकुल)
5)विकी भिवा पवार(वय 23 रा. मड्डी वस्ती ,सोलापूर)
6) श्रीकांत चंद्रकांत घोडके(वय 39,रा.जुळे सोलापूर परिसर,सोलापूर)
7) संतोष सागर बनसोडे(वय 36,रा मोहोळ,जि सोलापूर)

ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर,गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील अजय पाडवी, दिलीप किर्दक आयाज बागलकोटे ,संतोष येळे,कृष्णात कोळी,गणेश शिंदे सोमनाथ सुरवसे, सागर गुंड,राजकुमार पवार,कुमार शेळके, संजय काकडे,विजय निंबाळकर, यांनी पार पाडली आहे या विशेष कामगिरीचा सोलापूरकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गुन्हे शाखेने हस्तगत गेलेल्या मोटर सायकल क्रमांकाची यादी खालील प्रमाणे आहे.

MH 13 DN 9339 स्प्लेंडर प्लस

MH 13 DJ 61 31 होंडा शाइन

MH 13 BE 72 56 स्प्लेंडर

MH 45 Z 06 95 स्प्लेंडर प्लस

MH13 CM 63 40 होंडा शाइन

MH25 Y 67 96 स्प्लेंडर प्लस

MH11 AS 34 18 प्लेजर

MH 12 LZ 52 25 स्पेलेंडर प्रो

MH 11 CL 7704 स्पेलन्डर प्लस

MH 42 AC 9678 स्पेलन्डर प्रो

MH 12 लक्स 6070 स्पेलन्डर प्रो

MH 13 AV 4520स्पेलन्डर प्लस
फॅशन विना नंबर

MH13CE4773 HF Dulax

युनिकॉर्न, फॅशन प्रो विना नंबर

MH42AX0308
HF DILAX

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *