गड्डा याञेचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या कोर्टात ! सिद्धेश्वर भक्तांचा जीव लागला टांगणीला..

ग्राउंड रिपोर्ट

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर

सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेत यंदा नंदीध्वज यांची मिरवणूक होणार की नाही याबाबतचा निर्णय विभागीय आयुक्त चार-पाच दिवसात देतील असं सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे. सध्या तर यात्रेत किती संख्येने मानकरी यांना परवानगी मिळणार याचा निर्णय झालेला नाही .
खास बाब म्हणजे दक्षिण काशी पंढरपूरातील आषाढी आणि कार्तिकेचे महासोहळे रद्द झालेले असताना आता सोलापुरात गड्डा यात्रेत फक्त धार्मिक विधीनाच परवानगी मिळण्याची शक्यता सध्या तरी प्रशासकीय पातळीवर व्यक्त होत आहे .
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाची आता यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांना प्रतीक्षा आहे . पाच तारखेपर्यंत राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू असली, तरी यात्रेच्या पार्श्वभूमीवर, ही मुदत सोलापुरात वाढण्याची शक्यता आहेच‌ त्याचप्रमाणे यात्रेचे धार्मिक विधी ज्या ठिकाणी होतात त्या हिरेहब्बू वाडा ,संम्मती कट्टा, होमकुंड आदी ठिकाणी बंदोबस्त वाढविला जाण्याची शक्यता आहे‌.
एकूणच दक्षिणकाशी पंढरपुरातील मोठे महासोहळे प्रशासनाने रद्द केले .त्यामुळे गड्डा यात्रादेखील रद्द करण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे. त्याशिवाय तसा प्रस्तावही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांना दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे करूना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर, गड्डा यात्रा झाली आणि या गड्डा यात्रेच्या उसळलेल्या गर्दीतून कोरुना संसर्ग पसरल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? या महत्वाच्या मुद्द्यावर सोलापुरातील गड्डा यात्रा भरण्यासंदर्भात प्रशासन राजी नाही. त्यातूनच तब्बल साडेनऊशे वर्षाच्या यात्रेच्या परंपरेला यंदा खंड पडणार अशी नक्कीच चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *