‘शिवगर्जना न्यूज मराठी’च्या वस्तुनिष्ठ आणि सडेतोड वृतांकनांचे जोरदार पडसाद !अंत्यसंस्कार टोळीच्या बोक्यांमध्ये खळबळ, महापालिका उपायुक्त पांडेंचे कारवाईचे आश्वासन, पोलीस उपायुक्त कडुकरांच्या कडक कारवाईच्या सूचना… टायगर ग्रुपच्या बाबाची सारवासारव, सोलापूरकरांमध्ये माञ संतापाचा कडेलोट कायम

शिवगर्जना नेटवर्क स्पेशल

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. २२
शिवाजी भोसले / रवि ढोबळे
नेहमीच जागल्याची भूमिका ठेवत , दृष्ट प्रवृत्तींवर ‘प्रहार’ करून नेहमीच समाजमनासोबर राहणाऱ्या शिवगर्जना न्यूज मराठीने ‘कोरोना महामारातील पंचनामा’ या वृत्तामालिकेतून अंत्यंसंस्कार खर्चाआडून लाखो रूपयांचा मलिदा लाटण्याच्या सोलापूरातील नतदृष्ट प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर अंत्यसंस्कार करणाऱ्या टोळीतील बोके तसेच महापालिका व पोलीस प्रशासनात खळबळ माजली.
‘शिवगर्जना न्यूज मराठी’ च्या सडेतोड वृत्तमालिकेची दखल घेऊन सोलापूरच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईच्या सूचना केल्या. तर याच प्रकरणात महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दोषींवर कडक कारवाई करू, कंट्रोल रूमला नातेवाईकांनी तक्रार करावी, सहाय्यक आयुक्त सुनिल माने यांच्याकडे यासंबंधीची जबाबदारी देण्यात आल्याचं उपायुक्त पांडे यांनी शिवगर्जना न्यूज मराठीला सांगितलं.
अंत्यसंस्काराच्या आडून लाखो रुपयांची ‘माया’ उकळताना नातेवाईकांना वेठीस धरण्यासंबंधीच्या शिवगर्जना न्यूज मराठीच्या वस्तुनिष्ठ वृत्तांकनाची दखल घेऊन पोलीस शांतता कमिटीच्या काही सदस्यांनी सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच उपायुक्त ( परिमंडल ) वैशाली कडूकर, उपायुक्त ( गुन्हे ) बापू बांगर सहाय्यक आयुक्त ( गुन्हे ) अभय डोंगरे पोलीस प्रशासनातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर हे प्रकरण घालून
सोलापुरात चाललेल्या या आक्षेपार्ह प्रकरणाला कडक कारवाईतुन तातडीने आळा घालण्याची विनंती काल केली.
दरम्यान दूसरीकडं शिवगर्जना न्यूज मराठीच्या वृतानं मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ‘केअर ऑफ पीस’ संस्थेच्या टोळीमधील बोक्यांसह अन्य काही बोक्यांमध्ये एकच खळबळ माजली. कारवाईच्या धास्तीने या बोक्यांना पळताभूई थोडी झाली. भितीने काही बोके अंत्यसंस्काराच्या कामासाठी काल स्मशानभूमीमध्ये आले नसल्याची माहिती मिळाली.
तसेच टायगर ग्रुप आणि केअर ऑफ पीस या संस्थेच्या केतन बाबा याने शिवगर्जना न्यूज मराठीच्या वृत्तानंतर कारवाई टाळण्यासाठी आपली संस्था आणि या संस्थेचे प्रतिनिधी नि:स्वार्थी भावनेने आणि नि:शुल्क कसे काम करत आहेत हे मॅनेज्ड मुलाखती घेऊन एका यूट्यूब चॅनलवर दाखवत सारवासारवीचे प्रयत्न सुरू ठेवले.
तथापि असं असलं तरी दुःखद प्रसंगी नातेवाईकांना वेटीला धरत अंत्यसंस्कारांचा खर्चाआडून लाखो रुपये उकणाऱ्या टोळीमधील बोक्यांवर कारवाई ही व्हायलाच हवी, मृतांच्या टाळूवरचे लोणी चाटणार्यांना अद्दल घडायला हवीच, अशी नागरिकांची भावना असून या टोळीच्या कर्तृत्वाबद्दल सोलापूरकरांमध्ये संतापाची धग कायम आहे.
———
ठळक नोंद
——–
उपायुक्त पांडेंची कारवाई म्हणजे लांडग्याला लबाडाचे जेवण
अंत्यसंस्काराच्या खर्चाआडून लाखो रुपयांचा मलिदा लाटणार्‍या टोळीवर कारवाई करू असं आश्वासन महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिले असले तरी हे आश्वासन हवेतच विरून जाणार, त्यांचे हे आश्वासन म्हणजे लांडग्याला लबाडाचे जेवण ही वस्तुस्थिती होईल वाटते. कारण यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडण्यासह जमावबंदीचा आदेश पायदळी तुडवत सार्वजनिक स्वरुपात वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणाऱ्या कविता चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर उपायुक्त पांडे यांनी कोणतीच कारवाई केली नाही. पांडे यांना कारवाईसाठी यासंदर्भात पुरावे देऊनसुद्धा त्यांनी उलट कायदे आणि नियम पायदळी तुडविणाऱ्या चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई न करता पाठिशी घातले हे जळजळीत सत्य आहे.शिवाय मृतांवर अंत्यसंस्कार करण्याच्या कामातील ज्येष्ठ अनुभवी ‘लादेन’ यांच्याकडील अंत्यसंस्काराचे काम काढून घेऊन, ते कविता चव्हाण यांच्या केअर ऑफ पीस संस्थेला पांडे यांनीच दिल्याचा बोलबाला आहे. त्यामुळे पांडे हे चव्हाण यांच्या संस्थेवर पर्यायाने टोळीवर कारवाई कशी करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
ऑफिसर्स क्लबमधील आक्षेपार्ह प्रकरणासंदर्भातदेखील पांडे यांनी कारवाईची भूमिका दाखवलीच नाही. या प्रकरणातसुध्दा दोषींना अभय दिल्याचा इतिहास आहे.
————————+
ठळक नोंद
——-
नातेवाईकांनो तक्रार देण्यासाठी पुढे या..
तुमच्यासाठी हे आवाहन…
अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी जर कोणी पैसे मागत असेल तर मृताच्या सजग नातेवाइकांनी कंट्रोल रूम किंवा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनिल माने यांच्याकडे तक्रार करावी. माने यांचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 9422457941 असा आहे.
———–
ठळक नोंद
——-
वस्तुनिष्ठ आणि निर्भीड बाण्याच्या’शिवगर्जने’ च्या बातमीदारीचं भरभरून कौतुक
नेहमीच समाज मनासोबत रहात, जागल्याची भूमिका ठेवणाऱ्या, शिवगर्जना न्यूज मराठीनं अंत्यसंस्काराच्या खर्चाआडून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचा प्रकार सर्वथम चव्हाट्यावर आणून पाठपुरावा केला. जळजळीत सत्य चव्हाट्यावर आणलं. या प्रकरणात झालेली दमबाजी, बघुन घेण्याची भाषा याला भीक घातली नाही. निर्भिडपणे वृत्तांकन चालूच ठेवले.
नातेवाईकांच्या दुःखद प्रसंगाचा फायदा उठवून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार अंत्यसंस्कार टोळीने कसा चालवला आहे, या टोळीनं सेवाभावीवृत्तीच्या धर्माला कसं मातीत गाढलं… सेवाभावी वृत्तीचा धर्म आणि त्याबद्दलचा वारसा असलेल्या सोलापूरची प्रतिमा या संदर्भात कशी मलिन होत आहे, याचं सडेतोड, निर्भीड आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन ‘कोरोना महामारीतील पंचनामा’ या मालिकेतून शिवगर्जना न्यूज मराठीनं केलं. याबद्दल सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील समाज मनामधून शिवगर्जना न्यूज मराठीचं भरभरून कौतुक करणं सुरू आहे. प्रत्यक्ष भेटण्यासह भ्रमणध्वनी, आणि सोशल मीडियाच्या अनेक साईट्सवरून नागरिकांनी शिवगर्जनेचं कौतुक करत निर्भिड बाणा आणि वस्तुनिष्ठ बातमीदारीला सलाम अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *