अंत्यविधी खर्चाच्या आडून लुटणार्‍या स्मशानभूमींमधील लुटारू टोळ्याच हाकला,कमाईसाठी हापापल्यांना महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये वावरण्याचा अधिकार दिलाच कोणी ? सोलापूरकरांचा संतापजनक सवाल

शिवगर्जना नेटवर्क स्पेशल

पाठलाग बातमीचा…
शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. 23
कोरानाच्या हाहाःकारमुळे सोलापूरात उदभवलेल्या अत्यंत गंभीर आणि भयावह परिस्थितीत कोराना विषाणूमुळे मृत्यू आलेल्या मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दुःखद प्रसंगात मृतांच्या नातेवाईकांना वेठीला धरणार्‍या टोळ्यांना महापालिकेच्या स्मशानभूमींमधून हाकलणे हाच पर्याय योग्य आणि कायमस्वरूपी असून कमाईसाठी हपापलेल्यांना स्मशानभूमींमध्ये वावरण्याचा अधिकार दिलाच कोणी? असाच संतापजनक सवाल सोलापूरातील सुज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे.
विशेषत्वे, अंत्यसंस्काराच्या खर्चाआडून पेसे उकरणार्‍यांच्या विरोधात पोलीस कारवाई तर होणे अपेक्षीत आहेच, पण स्वत:चे उखळ पांढरे करून घेणार्‍या टोळ्याच स्मशाभूमींमधून हद्दपार केल्या आणि दुसर्‍या बाजूला सेवाभावी वृत्तींने अंत्यंसंस्कार करणार्‍यांना हे काम करण्याची संधी दिल्यास, मृतांच्या नातेवाईकांना लुटण्याचे प्रकार कायमचे थांबतील अशाही प्रतिक्रिया काही सुज्ञ सोलापूरकर नागरिकांनी ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ कडे व्यक्त केल्या.
——————
ठळक नोंद
—————-
उपायुक्त पांडेंनी केअर आफॅ पिस या संस्थेला दिला ठेका
गेली अनेक वर्षे जमाईत उल्ल हिंद या संस्थेचे कार्यकर्ते लादेन हे अत्यंसंस्कार करण्याचे काम करीत होते. तथापि महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी लादेनकडील हे काम काढून घेवून कविता चव्हाण यांच्या केअर आॅफ पिस या संस्थेला दिल्याची चर्चा महापालिका आणि स्मशानभूमींच्या वर्तुळात आहे. त्याशिवाय खुद्द पांडे यांनीच कविता चव्हाण यांना अत्यंसंस्काराचे काम दिले आहे, तुम्ही आता हे काम करू नका असे खुद्द पांडे यांनीच लादेनला सांगितल्याची माहिती मिळाली.
—————–
ठ़ळक नोंद
————
कविता चव्हाण आणि केतन बाबा यांची टोळी जशी आहे, त्याप्रमाणेच मुनीर रंगरेज, परेस आणि मुन्ना यांच्यादेखील टोळ्या कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.
आहेत. या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.परेश हा यशोधरा हॉस्पिटलमध्ये ठिय्या मांडून अंत्यसंस्काराची सेटिंग लावतो तर मुनीर रंगरेज हा रुपाभवानी स्मशानभूमीत ठिय्या मांडून सेटिंग करतो अशी माहिती समोर आली आहे.
———————
ठळक नोंद
—————-
खुद्द लादेन म्हणतात, एका अत्यसंस्कारासाठी चार हजार बक्कळ
वास्तविक विद्युत दाहिनीत अत्यंसंस्कार करण्यासाठी एक नया पैशाचा खर्च येत नाही, सरवणावर अत्यंसंस्कार करायचा झाल्यास 3000 ते 3300 लाकडाचा खर्च, 250 रूपये डिझेल, चिता रचणे 300 रूपये आणि लाकूड वहातुक 250 ते 300 आदी सगळा खर्च 4 हजार येतो. त्यापेकी 1 हजार महापालिकेकडून मिळतात. उर्वरीत 3 हजार मृताच्या नातेवाईकांकडून घेण्याची रूढ कोरानापूर्वी होती. नातेवाईक तेवढे पेसे काही तक्रार न करता देत होते, असे असताना आता 10 ते 28 हजारांची उकळपट्टी का असा खुद्द लादेन यांचाच सवाल आहे.
—————
ठळक नोंद
————-
केवळ कमाईसाठीच लादेन गॅंगने घेतली उडी
जमाईत उल्ला ही मुस्लीम संघटना सेवाभावी वृत्तीने मृतांवर अत्यंस्कार करायची. लादेन यांच्यासह नऊजण अत्यंसंस्काराचे काम करायचे. जादा पेसे उकळण्याचा प्रकार या गॅंगकडून होत नव्हता. नातेवाईक जेवढे पेसे द्यायचे तेवढी ही गॅंग पैसे घ्यायची. पण लादेनकडील आठजणानीं केतन बाबा यांच्या गॅंगमध्ये जाणे पसंद केले. येथे जावून पैशाच्या हव्यासापोटी ‘माया’ उकळण्याचा धंदा सुरु ठेवला आहे. लादेन माञ अत्यंसंस्काराच्या कामापासून बाजूलाच आहेत.
————–
ठळक नोंद
————-
कविता चव्हाण म्हणाली,…तर माझ्या जन्मदात्या वडिलांच्या टाळूवरचे लोणी चाटल्यासारखे होईल !
‘शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क’ कडे कविता चव्हाण यांनी स्वत:हून आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, अंत्यसंस्कार खर्चाच्या आडून आम्ही अजिबात पैसे कमावत नाही. माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे. मी असे पैसे का कमवू, असे पैसे मी जर कमवत असेन तर मृत्यू पावलेल्या माझ्या वडलांच्या टाळूवरचे लोणी मी चाटल्यासारखे होईल, अंत्यंसंस्कार आडुन पैसे कमविण्याचे पाप मी का करु ? असे भावनिक उदगार त्यांनी काढले. मी इतकी वाईट आहे हो ? मी नि:स्वार्थपणे सेवाभावी वृत्तीने कोरोना महामारीत काम करीत आहे, तरीही एवढे भयानक आरोप माझ्यावर होत आहेत. या आरोपांचा मला खुप ञास होतोय असं ती सांगत होती.अंत्यसंस्कार करण्याला खर्च येतो हे वास्तवही त्यांनी या वेळी सांगून टाकले.
या भावना व्यक्त करताना कविताला आश्रू अनावर झाले.माझं सगळचं बरोबर आहे, असं मी म्हणत नाही, काही चुकतदेखील असेल मला मार्गदर्शन करावं. पण बदनामी करून न घेता मी चांगले काम करेन असं यावेळी ती सांगायला विसरली नाही.
——-
ठळक नोंद
——
कवितासह अन्य कोरोना योध्दा यांच्या कार्याला सलाम, मात्र वृत्तीला कडाडून विरोध !
सोलापुरातील कोरोनाच्या महामारीत निर्माण झालेल्या अत्यंत कठीण प्रसंगी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी भावकी, शेजारचे लोक , नातेवाईक, घरातील लोक हे जिथं यायला तयार नाहीत, तिथे स्वत:चा तसेच आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून कविता चव्हाणसह अनेक कोरोनायोध्दे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे अत्यंत गौरवास्पद काम करीत आहेत, त्यांच्या या कार्याला तमाम सोलापूरकरांच्यातीने ‘शिवगर्जने’चा मानाचा मुजरा आहे.
पण अंत्यंसंस्कार खर्चाच्या आडून दुःखद प्रसंगी मृतांच्या नातेवाईकांना वेठीस धरण्याचा आणि त्यांना नागवून हजारो रूपये उकळ्याची ज्या स्वयंसेवकांची म्हणजे टोळ्यांची पर्यायाने कमाईसाठी टपलेल्या बोक्यांची वृत्ती आहे, या नतदृष्ट वाईट प्रवृतीला कडाडून विरोध आहे आणि तो कायमच असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *