ब्रेकिंग!उद्यापासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस…

ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 18

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उद्या दिनांक 19 जून 2021 रोजी 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी कोव्हीशिल्ड लसीकरण पहिला डोस, करण्यात येणार असून याबाबत शहरातील पाच नागरी आरोग्य केंद्र येथे हे लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी आज रात्री ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. ऑनलाइन नोंदणी झाल्या नंतरच लस देण्यात येईल. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्टर करणे गरजेचे आहे.उद्या दाराशा नागरी आरोग्य केंद्र, साबळे नागरी आरोग्य केंद्र, भावना ऋषी नागरी आरोग्य केंद्र, मुद्रासन सिटी नागरी आरोग्य केंद्र, रामवाडी नागरी आरोग्य केंद्र येथे लस उपलब्ध करण्यात आली आहे. थोड्याच वेळात ही सत्रे बुकिंग साठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.30 ते 44 वयोगटाच्या नागरिकांनी तात्काळ बुकिंग करावे.
शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून covid.gov.in या वेबसाईटर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे व दिलेल्या वेबसाईटर योग्य ती आपली माहिती अपलोड करुन आपल्या जवळच्या आरोग्य सेंटरची निवड करुन रजिस्ट्रेशन करु शकता असे आवाहन मनपाच्या वतीने आयुक्त पी.शिवशंकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *