व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला २२ हजार कोटी रुपयांचा खटला

व्होडाफोन समूहानं भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. या निर्णयामुळे पूर्वलक्षी प्रभावानं कर लागू करण्याच्या भारताच्या निर्णयाला चांगलाच फटका बसला आहे. हेग मधल्या कायमस्वरुपी आंतरराष्ट्रीय लवादानं भारतीय प्राप्तीकर खात्यानं कररचनेसाठी समान न्यायी पद्धत अवलंबली नसल्याचे ताशेरेही ओढले आहेत. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय लवादानं या प्रकरणासंदर्भातील निकाल देताना, “व्होडाफोनवर भारत […]

Continue Reading

मराठा आरक्षण: मुंबईत 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन, पोलीस भरतीच्या घोषणेनंतर मराठा संघटना आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सरकारने आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईत आज (20 सप्टेंबर) 18 ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले […]

Continue Reading

FinCEN फाईल्स : HSBC नं इशारा मिळूनही पॉँझी स्कीमचे लाखो डॉलर हस्तांतरित का केले?

घोटाळ्याबद्दल माहिती मिळालेली असतानाही एचएसबीसीने संबंधित घोटाळेबाजांना लाखो डॉलर लंपास करायला मोकळीक दिली, असं बाहेर आलेल्या गोपनीय दस्तावेजांवरून स्पष्ट होतं. ब्रिटनमधील या सर्वांत मोठ्या बँकेने अमेरिकेतील आपल्या शाखांमधील पैसा 2013 व 2014 साली एचएसबीसीच्या हाँगकाँगमधील खात्यांकडे फिरवला. या आठ कोटी डॉलरांच्या घोटाळ्यातील बँकेची भूमिका अलीकडेच बाहेर आलेल्या दस्तावेजांवरून- बँकांच्या “संशयास्पद व्यवहारांसंबंधीचे अहवाल”- उघड झाली असून […]

Continue Reading

कृषी विधेयक : महाराष्ट्रातील शेतकरी शांत का आहेत?

नरेंद्र मोदी सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. यामुळे देशातल्या पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मात्र विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनं होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मोदी सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आणि राज्यातील शेतकरी […]

Continue Reading

कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading

कृषी विधेयक: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदींना मदत केली का?

कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही तिन्ही विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर करून घेण्यात मोदी सरकारला यश आले आहे. कृषी विधेयकाला काँग्रेसकडून प्रचंड विरोध होत असताना मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मात्र भाजपच्या या विधेयकाला स्पष्ट विरोध दर्शवला नाही. त्यामुळे शिवसेना […]

Continue Reading