अखेर अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कामती पोलिस चौकीच्या वास्तुप्रश्न मार्गी लागला….

क्राईम

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

विरवडे बु /प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाली असून, ही इमारत वेगवेगळ्या कंपन्या व लोकवर्गणीतून साकारण्यात आली आहे. यामुळे गेल्या 11 वर्षापासूनची पोलिसांची अडचण दूर झाली आहे, तर कामात सुसूत्रता येणार आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनामुळे व अनेकांनी केलेल्या वस्तू रुपी मदतीमुळेच हे शक्य झाल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.

मोहोळ पोलिस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र कामती पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली 28 गावांचा कारभार चालतो. 2010 पासून पोलिसांचे कामकाज एका पत्राशेडमध्ये, राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सुरू आहे. विविध वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, आवाज, नागरिकांचा गोंगाट, यामुळे पोलिसांना काम करणे अडचणीचे ठरत होते. पुरेसे लॉकअप नाही, त्यामुळे आरोपींना मोहोळ किंवा मंद्रूप पोलिस ठाण्यांच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागते, त्यात वेळ व श्रम मोठे वाया जातात. कामती पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली कुरुल, कामती व बेगमपूर ही तीन बीट आहेत. सध्याची नवीन इमारत मंगळवेढा सोलापूर महामार्गा नजीक असल्याने दळणवळण ही सोयीचे झाले आहे.

प्रत्यक्षात वरिष्ठांशी व इतरांशी चर्चा झाल्यानंतर कामाला चार महिन्यापुर्वी सुरवात झाली .कामती बुद्रुक व कामती खुर्द या दोन्ही गावाच्या मध्यभागी ही इमारत साकारली आहे. कोणाकडून ही पैसे घ्यावयाचे नाहीत या प्रमाणे सिमेंट खडी, स्टील, दारे-खिडक्या, रंग, या वस्तू रूपाने सर्वांनी मदत केली. त्यात बालाजी अमाईन्स, एस एम अवताडे आणि कंपनी, सरपंच रामराव पाटील, शिवानंद पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे मोठे योगदान लाभले आहे.

सुमारे 4हजार स्क्वेअर फुट बांधकाम असलेल्या नवीन इमारतीत एकूण बारा खोल्या आहेत त्यात एक अधिकारी कक्ष,सह अधिकारी कक्ष, ठाणे अंमलदार, गोपनिय, ऑनलाईन, पुरुष कस्टडी, स्त्री कस्टडी, कर्मचारी, महिला कर्मचारी यांचे विश्रांती कक्ष, व बैठक व्यवस्था, कारकून विभाग, बैठक हॉल, असे सर्व विभाग स्वतंत्र केले असून, संपूर्ण परिसरात ऑक्सिजनयुक्त झाडे लावली असल्यामळे इमारत देखणी दिसतं आहे, इमारतीच्या बाहेर आमदार यशवंत माने यांच्या निधीतून 2तर प. स. सदस्या सुनीता भोसले यांच्या निधीतून 1असे तीन हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहते,

चोकत @@
लोकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले,
कामती पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी मोठा खर्च होता म्हूणन आम्हीला या परिसरातील गावोगावचे राजकीय व सामाजिक कार्य करणारे, व दानशूर व्यक्तीने शक्य होईल तेवढी मदत केली तर काहींनी कमी पडेल ते साहित्य आम्हांला दिले आहे तरी या इमारतीचे लवकर उदघाटन सोहळा मोठया उत्साहात करण्यात येणार असल्याची माहिती
अंकुश माने (सपोनि कामती पोलीस ठाणे )यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *