आषाढी एकादशीच्या सोहळ्याला आकाशवाणी आणि दूरदर्शन पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल सोलापूर दौऱ्यावर…

मोस्ट लोकल न्यूज

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि 19
आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे राज्यस्तरीय प्रसारण सुरळीत पार पडावे म्हणुन आकाशवाणी आणि दुरदर्शनचे पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत नीरज अग्रवाल सोलापूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी आकाशवणी सोलापूर केंद्राला भेट दिली. आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम,अभियांत्रिकी आणि प्रशासकीय विभागासह, दूरदर्शन लघुक्षेपण केंद्र, टेप लायब्ररी आणि स्टुडिओची त्यांनी पाहणी केली. डिजिटल संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचनाही त्यांनी दिल्या.
माध्यमांच्या यशस्वितेत आशयनिर्मितीला सर्वोच्च स्थान असते. आकाशवाणी सोलापूरचे कार्यक्रम नेहमीच आशयसंपन्न असतात. यामुळेच या केंद्राची लोकप्रियता वाढीस लागली आहे असे ते म्हणाले. सोलापूर आकाशवाणीचा अभियांत्रिकी विभागही नविन तंत्रज्ञानाची निर्मिती आणि अंमलबजावणीत कायम अग्रेसर असल्याचे उद्गार त्यांनी काढले. यामुळे अधिकारी आणि कर्मचा-यांचा उत्साह द्वीगुणीत झाला. गुणवत्तापूर्ण कार्यक्रम, अद्ययावत उपकरणे, स्वयंविकसित सॉफ्टवेअर्स, लायब्ररीचे डिजिटायजेशन आणि ई-ऑफिस यांसोबतच परिसरातील सौंदर्य आणि स्वच्छतेचे त्यांनी कौतुक केले. अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये सुसंवाद आणि सौहार्द असेल तर कठिण ध्येयसुद्धा सहज साध्य होऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सोलापूर आकशवाणीचे सहायक संचालक तथा केंद्रप्रमुख सुनिल शिनखेडे, दूरदर्शनचे सहायक अभियांत्रिकी निदेशक शाहू देशपांडे, सहायक अभियंत्या अर्चिता ढेरे, कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, अभियांत्रिकी सहायक दिलीप मिसाळ, प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, लायब्ररी सहायक जयश्री पुराणिक, उद्घोषक अभिराम सराफ, बाळासाहेब मस्के आणि ईतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *