सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघात येत्या पाच दिवसात 1000 बेडचे कोविड सेंटर उभे करावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा आम्ही सोलापूर युवक संघाच्या वतीने देण्यात आला…

बिग ब्रेकिंग

शिवगर्जना न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर

सध्या सबंध देशात covid-19 या महाभयंकर रोगाने थैमान माजवले आहे यातून सोलापूर शहरी हि सुटू शकले नाही सोलापूर शहरात सध्या प्रत्येक हॉस्पिटल मध्ये पेशंटला ऑक्सिजन व्हेंटिलेटर रेमडिसिव्हर इंजेक्शन बेड मिळत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मोठे हाल होत आहेत एकीकडे सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण चे आमदार आणि सोलापूरचे खासदार हे मत मागण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करतात त्या पद्धतीने त्यांनी या महामारी च्या काळात आपापल्या मतदारसंघात एक हजार बेडचे कोव्हिडं सेंटर उभे करावे एक जागृत लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे महाराष्ट्रात काही आमदारांनी स्वतंत्र कोव्हिडं सेंटर आपल्या मतदारसंघात सुरू केले आहेत त्याचाच आदर्श घेत सोलापूर शहरात शहर उत्तर चे आमदार विजयकुमार देशमुख, शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे, दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख आणि खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी येत्या पाच दिवसात कोव्हिडं सेंटर उभे करावे अन्यथा आम्ही सोलापूर युवक संघाच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सोलापूर युवक संघाचे प्रमुख गोविंद कांबळे आणि रोहित खिलारे यांनी दिला….

येत्या पाच दिवसात सोलापूर शहरात लोकप्रतिनिधी यांनी कोव्हिडं सेंटर उभे केले नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार असून होणाऱ्या परिणामास सर्वस्वी तीन लोकप्रतिनिधी आणि खासदार जबाबदार असतील असा इशारा आम्ही सोलापूरकर युवक संघाचे प्रमुख बंडू गवळी आणि किरण राठोड यांनी यावेळी दिला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *