कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?

अर्थकारण उद्योग ऑन दि स्पाॅट रिपोर्ट क्राईम खेळ ग्राउंड रिपोर्ट जरा हटके न्यूज बातमी पुढची बातमी बातमी मागची बातमी बिग ब्रेकिंग ब्रेकिंग मोस्ट लोकल न्यूज राजकीय शिवगर्जना नेटवर्क स्पेशल शेती सहकार स्टोरीज

उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता.

दिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे.

कन्हैया म्हणतात, “जे आता सत्तेत आहेत, त्यांना वाटतं की, विरोधामध्ये उमटणाऱ्या आवाजाचं अपराधीकरण केलं जायला पाहिजे. खोट्या आरोपांच्या आधारे, बनावट व्हीडिओ बनवून तिंवा चुकीच्या पद्धतीने व्हॉट्स अप मेसेज तयार करून विरोध करणाऱ्यांना लोकांमध्ये बदनाम करायला पाहिजे.”

सरकार जर इतकं निष्पक्ष आहे, तर त्यांनी उघडपणे लोकांना गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्यांची, दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत दंगे घडविण्याची भाषा करणाऱ्यांची चौकशी का नाही केली, असा प्रश्न कन्हैया यांनी उपस्थित केला. त्यांना काही होत नाहीये. या देशात दंगे घडविण्याचा आरोप असलेले, तडीपार झालेले लोक सत्तेत आहेत. न्यायाचा आवाज दाबला जात आहे.

याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चे संस्थापक उमर खालिद यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अटक केली आहे.

सध्या उमर खालिद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. UAPA कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेला विविध विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता.

दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी झालेल्या अटकेविरोधात दिल्ली प्रेस कल्बमध्ये प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण आणि एनी राजा यांच्यासह काही सामाजिक संघटनांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलणाऱ्यांच्या यादीत कन्हैय्या कुमार यांचंही नाव होतं. मात्र ते या कार्यक्रमाला आले नाहीत.

“ज्यादिवशी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतो. तुम्ही माझी फेसबुक पोस्ट पाहा. मी अटकेचा निषेध केला आहे,” असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *